? 66 वर्षीय नराधमाने केला 8 वर्षच्या चिमुरडीवर अत्याचार
पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी
महाळपूर ता. पारोळा
दहा वर्षाची मुलगी तिचे आई वडील घरी नसताना दिनांक ३ रोजी दुपारी १२वाजता महादू भीला पाटील राहणार महाळपुर तालुका पारोळा वय ६६ वर्षे या इसमाने या पीडित मुलीस महाळपुर येथील मंदिराच्या बाजूला नेऊन गैरप्रकार केला.तिची आई जेव्हा चार वाजता घरी आली तेव्हा त्या मुलीने आईला सांगितले की महादू बाबा घरी आला होता, त्याने मंदिराच्या बाजूला नेऊन माझ्याशी गैरप्रकार केला असे आईस सांगितले. पारोळा पोलीस स्टेशन येथे कलम ३७६अन्वये आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केले आहे.






