पिंपळखुटा येथे कोरोनाचा एक पॉझिटिव रुग्णआढळला
पातुर ता प्रतिनिधि विलास धोंगडे
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे ३५ वर्षीय युवक कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. पातुर चे तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनात चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे, सरपंच सुनिता रविंद्र शेलार, मंडळ अधिकारी, यांनी गावातील सर्व दुकाने बंद करून पूर्ण गाव सील केल्याची कारवाई केली आहे. पिंपळखुटा येथील ३५ वर्षीय युवक १ जून रोजी खामगावला मोबाईल आणण्यासाठी गेला होता. खामगाव तालुक्यातील जनुना येथे रात्री बहिणीच्या घरी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी २ जून रोजीच्या सायंकाळी पिंपळखुटा येथे परत येत असताना पावसाच्या पाण्यात भिजल्याने त्याची तब्येत खराब झाली, त्यांनी पिंपळकोटा व चान्नी, येथे खाजगी रुग्णालयात ३ ते ४ दिवसापर्यंत उपचार घेतला परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने त्यांनी ११ जून रोजी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे स्वेब नमुने बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.१३ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्याच्यावर सध्या खामगाव येथे उपचार सुरू आहे.याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनात गाव सील करण्यात आले आहे. यावेळी ठाणेदार गजानन वनारे,सरपंच पोलिस पाटील मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते तसेच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.






