Amalner

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

रजनीकांत पाटील

अमळनेर-कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामिण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला देण्यात आले.

माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध केले असून सदर युनिट ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे व डॉ संदीप जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.दरम्यान अमळनेर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 22 मे रोजी नगरपरिषद कार्यालय येथे करण्यात आली होती. याप्रसंगी शहरातील नावाजलेले डॉ अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुने,डॉ. संदीप जोशी,डॉ नितीन पाटील,डॉ प्रशांत शिंदे,डॉ किरण पाटील इत्यादी शहरातील नामांकित डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली याप्रसंगी डॉक्टर अविनाश जोशी यांनी रुग्ण तपासणी कामी आवश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांच्या उपचार कामी खरेदी करणे आवश्यक असल्याबाबत मत नोंदविले होते, त्यानुसार माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्वरित सूचना केल्याने पालिकेतर्फे काल रोजी डॉ अविनाश जोशी यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अमळनेर नगर परिषदेतर्फे ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी देण्यात आले.

कोरोना विषाणू ग्रामीण भागासह अमळनेर शहर पसरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे, कारण रोज रोज वाढत जाणाऱ्या कोरोना बाधितामुळे साखळी तुटलेली नसून वाढत चालली आहे. संक्रमण कसे होते हे हे समजत नसल्याने नागरिकांनी कृपया काळजी घ्यावी आणि शासन आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करून स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना सहकार्य करावे अशी विनंती मा आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.

सदर युनिट वितरणप्रसंगी याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,डॉ.प्रकाश ताडे, डॉ.संदीप जोशी, डॉ.अविनाश जोशी.न.पा.चे संजय चौधरी, संजय पाटील,डॉ.राजेंद्र शेलकर, महेश जोशी, भाऊसाहेब सावंत यासह इतर मान्यवर उपस्थित होते.शहरात कोरोना उपाययोजनेत अमळनेर पालिका प्रत्येक ठिकाणी आपले योगदान देत असून यामुळे कोरोनावर मात करण्यात यशही येत आहे.

अत्यवस्थ रुग्णांना होणार फायदा…

अमळनेर ग्रामिण रुग्णालयाचे डॉ प्रकाश ताडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आज स्थितीला 34 ऑक्सिजन सिलेंडर असून 10 जम्बो सिलेंडर आहेत,कोविड रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होण्याची संभावना असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते यामुळे हे आधुनिक ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपयुक्त ठरेल अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button