Kolhapur

सलग १० व्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा सण म्हणून साजरा

सलग १० व्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा सण म्हणून साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी – विक्रम राजवर्धन

हिंदुस्थानाच्या इतिहासातील सोनेरी क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. ६ जून १६७४ रोजी रायगड येथे शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक झाला अन हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी राजा झाले. ही घटना जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी होती म्हणून या दिवसाचे महत्व लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचाराने भारावलेला आणि राजमाता जिजाऊच्या चरणी नतमस्तक होणारा कागल तालुक्यातील कुरणीचा युवक रायगडवर न जाता गावात ६ जून हा दिवस सण म्हणून साजरा करीत आहे तो युवक तुकाराम पाटील होय. स्वामी विवेकानंद समाज विकास संस्था आणि शिवशाहू महाराष्ट्र पदवीधर महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, व शैक्षणिक तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नामवंत मावळ्यांचा गौरव करण्याच काम या संस्थेच्या माध्यमातून करीत आहे. तसेच हा युवक नेहमीच गोरगरीब जनतेच्या मदतीला धावणारा, मुलांना शैक्षणिक मदत करणे, महिलांच्या साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने करीत आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ शिवछत्रपतीच्या प्रेमापोटी हा मावळा गेली १० वर्षे कधी पुरणपोळी तर कधी जिलेबी, लाडू आपल्या गावात घरोघरी वाटून शिवराज्याभिषेक दिन सण म्हणून साजरा करीत आहे.

छ.शिवाजी महाराजांचे वंशज राज्य सभेचे खासदार युवराज संभाजीराजे आणि संयोगीताराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिन सण म्हणून साजरा करावा असे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत कुरणी ता.कागल च्या तुकाराम पाटील या युवकाने सन २०११ पासून आपल्या गावी प्रत्येक घरोघरी गोडधोड पदार्थांचे वाटप करून हा दिवस सण म्हणून साजरा करावा असे आवाहन करीत असताना गावातील सर्व शिवप्रेमींनी चांगला प्रतिसाद देत शिवराज्याभिषेक दिन सण म्हणून साजरा करण्यास सहकार्य केले. गावपातळीवर जेव्हा हा दिवस सण म्हणून साजरा झाला तेव्हाच हा युवक रायगडकडे रवाना होत असताना गावातील सर्वसामान्य कुटुंबातील पन्नासएक शिवभक्तांना स्व:खर्चाने घेऊन रायगडवरती गेला. आणि महाराजांच्या समोर नतमस्तक झाला. हे सर्व शिवभक्त गडस्वच्छता मोहिमेमध्ये तसेच राज्याभिषेक समितीस सहकार्य करीत असतात.

यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व दक्षता घेऊन यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा कुरणी ता.कागल हनुमान मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिवभक्तांनी गावातील प्रत्येक घरोघरी जिलेबीचे वाटप करून हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाऊ पार्टे, राहुल सुतार, श्रीकांत पाटील, किरण सौंदलगेकर, सुरज पाटील, विजय मोरे, सुरेश कोरे, दत्ता पाटील, निवास पाटील, रघुनाथ भारमल, नेताजी पाटील, शुभम पाटील, आकाश पाटील, अविराज माने, रामराज गुरव, राहुल शेंडे, संदीप खोत, प्रतिक पाटील, सत्यम माने, वैष्णव पाटील, प्रतिक माने, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button