मा.ना.बचू कडू यांचा विरोधी पक्ष नेत्यांवर कडाडून प्रहार
विलास धोंगडे
अकोला : कोरोनामुळे राज्यातील निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरत आहे अशी तक्रार राज्यपालांकडे करत भाजपने राज्यभर आंदोलन केले होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते सतत पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहे. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.इतक्या खालच्या पातळीवर उतरून राजकारण केलं तर जनता तुम्हाला सहन करणार नाही. लोकं दारात सुद्धा उभं करणार नाहीत’ असे म्हणत बच्चू कडू यांनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षाने सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे. सध्याच्या कठीण काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन काम करून या संकटातून देश आणि राज्याला बाहेर काढायला हवे , या वेळी विरोधकांकडून अशा प्रकारचे राजकारण अपेक्षित नाही, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करावे. त्यांनी ज्या पद्धतीने टीकेचा, आंदोलनाचा मार्ग निवडला आहे तो योग्य नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सरकारला या कामात नक्कीच यश येईल, असे ते म्हणाले आहेत.






