Amalner

अमळनेर नगरपालिकेच्या ५५५ कर्मचाऱ्यांची केली आरोग्य तपासणी… प्रत्येकाला केले सॅनिटायझरचे वाटप..

अमळनेर नगरपालिकेच्या ५५५ कर्मचाऱ्यांची केली आरोग्य तपासणी… प्रत्येकाला केले सॅनिटायझरचे वाटप..

रजनीकांत पाटील

अमळनेर : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी , सफाई कर्मचारी आणि कार्यालयीन अशा 555 कर्मचाऱ्यांची नगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली व नगरपरिषदेने प्रत्येकाला सुरक्षेसाठी सॅनिटायझर वाटप केले.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानी सर्वेक्षण, बरिकेट्स लावणे, कारवाई करणे, लिलावचे व्यवस्था करणे, सफाई करणे, फवारणी करणे, धोकेदायक कंटेन्मेंट झोन मध्ये सेवा देणे आदी कामे केल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात आली होती म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून त्यांची स्क्रीनिग करून इतर ही आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना दिले.

त्यानुसार डॉ संदीप जोशी, डॉ अविनाश जोशी, डॉ निखिल बहुगुणे, डॉ. नितीन पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ विलास महाजन, डॉ राजेंद्र शेलकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी 555 नगरपालीका कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन व उपचारही करण्यात आलेत. नगरपालिकेत ही तपासणी करण्यात आली. प्रत्येकाला सॅनिटायझर वाटप केले. यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे , सोमचंद संदनशिव, महेश जोशी , प्रसाद शर्मा यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button