कंटेन्मेंट झोन व वृद्ध आजारी लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सरसावले
अमळनेर : तालुक्यातून 108 पैकी फक्त 3 पॉझिटिव्ह रुग्ण शिल्लक असले तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे आणि अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कंटेन्मेंट झोन व वृद्ध नागरिकांकडे लक्ष केंद्रित केले असून औषधी पुरवठा केला आहे कंटेन्मेंट झोनमध्ये 7 हजार नागरिकांना सुरक्षेसाठी औषधी वाटप करण्यात आले.
अमळनेर शहरात एक किमी परिसरातील साळी वाडा , झामी चौक , कासार गल्ली , अमलेश्वर नगर , शाहआलम नगर , बहादरपूर नाका , अंदरपुरा , सराफ बाजार , भोईवाडा, कसाली मोहल्ल आदी भागात 100 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि हा भाग सील करण्यात येऊन कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला होता हा भाग दाट वस्तीचा असल्यामुळे या भागात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे तर वृद्ध व आजारी नागरिकांना देखील लागण लवकर होऊ शकते म्हणून कंटेन्मेंट झोन आणि वृद्ध आजारी लोकांना होमियोपॅथी औषधी वाटून त्यांची प्रतिकार शक्ती वाढवून कोरोना पासून बचाव करून तालुका लवकर कोरोनामुक्त करू शकतो अशी संकल्पना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे आणि अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मांडून औषधी मागवून प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ आणि स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने सुमारे 150 स्वयंसेवक मार्फत 9 कंटेन्मेंट झोन , पैलाड , तांबेपुरा , नगरपालिका समोर व प्रतापनगर मधील लोकांना मोफत होमियोपॅथी औषधी वाटल्या यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी विद्या गायकवाड नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी , महेश जोशी संबंधित नगरसेवक यांचे सहकार्य लाभले त्यासोबतच मधुमेह , कॅन्सर , किडनी , क्षयरोग , हृदयविकार ,दमा , खोकला असे आजार असलेले वृद्ध लोकांचा सर्व्हे करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी त्यांनाही औषध वाटप करण्यात येणार आहेत यामुळे संपूर्ण अमळनेर तालुका लवकर कोरोनामुक्त करण्यात यश मिळणार आहे.
नागरिकांनी होमियोपॅथी औषधी वेळेवर नियमाप्रमाणे घेऊन पथ्य पाळावे म्हणजे प्रतिकार शक्ती वाढून कोरोनाचा विषाणू काहीच अपाय करू शकणार नाही असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे






