Amalner

?️ Big Breaking अमळनेर Non Red Zone मध्ये…उद्या पासून सर्व दुकाने उघडे राहतील.. ही आहे नियमावली

?️ Big Breaking अमळनेर Non Red Zone मध्ये…उद्या पासून सर्व दुकाने उघडे राहतील.. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ..

ही आहे नियमावली

मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेशान्वये जळगांव शहर
महानगरपालिका जळगाव यांचे कार्यक्षेत्र वगळता जळगांव जिल्हयातील इतर क्षेत्राचा समावेश हा Non Red Zone (Orange & Green Zone) मध्ये करण्यात आलेला आहे. सदर क्षेत्रात शासन आदेश नुसार 13 व 14 मध्ये नमुद केलेल्या बाबी दिलेल्या निर्देशानुसार लागु राहतील असल्याबाबत आदेशित केलेले आहे.

2. कन्टेनमेंट झोन मध्ये व्यक्तींना बाहेर जाण्याची व आत मध्ये येण्याची परवागनी राहणार नाही
तसेच पुर्वीप्रमाणेच निर्बंध लागु राहतील.

3. त्यानुसार अमळनेर तालुक्यामध्ये दि.22/05/2020 ते दि.31/05/2020 या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये
औषधी व्यवसायीक, नर्स, पॅरा मेडीकल स्टाफ, सॅनिटेशन पर्सनल, अॅम्बुलन्स, सुरु राहतील, तसेच सर्व प्रकारच्या वस्तु / मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

4. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती, तिन चाकी वाहनावर 2+1 व्यक्ती, चार चाकी वाहनामध्ये 2+1 व्यक्तींनाच प्रवास करता येईल.

5. सर्व प्रकारचे दुकाने हि खुले राहतील सदरची दुकाने हि फक्त सकाळी 09:00 ते सायंकाळी 05:00 याच वेळेत खुली राहतील. सदर दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची सोशियल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन केलेले नसल्याचे आढळून आल्यास सदर दुकाने हे तात्काळ बंद करण्यात येतील.

6. सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये मालक आणी ग्राहक यांचेमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे. एका वेळेस जास्तीत जास्त 5 व्यक्तींनाच परवानगी दिली पाहीजे.

7. घराबाहेर पडतेवेळी सर्वाना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी थुंकन्यास पुर्ण पणे बंदी आहे. असे आढळुन आल्यास त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल.

8. सर्व व्यक्तींना घराबाहेर पडतांना सोशियल डिस्टंसिंगचे पुर्ण पणे पालन करणे अनिवार्य आहे.

9. लग्न समारंभाच्या ठिकाणी तसेच अंत्यविधी यात्रेस जास्तीत जास्त 20 व्यक्तींनाच परवानगी असेल. सदर समारंभ/यात्रेमध्ये पुर्ण पणे सोशियल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुनच केले असावे.

10. दारु, पान, तंबाखु, व इत्यादींचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्यास पुर्ण पणे बंदी असेल.

11. सर्व प्रकारच्या दुकानांध्ये हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझर ची व्यवस्था करणे बंधनकारक राहील. त्यानंतरच व्यक्तींना खरेदीसाठी परवानगी देणेत यावी.

12. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविणेत येते की, अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करु नका, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा घरात रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसिलदार अमळनेर करीत आहे.

13.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अमळनेर तालुक्यामध्ये घोषीत करणेत आलेल्या
कन्टेनमेंट झोन मधील व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी याकामी शासनामार्फत पुरविणेत आलेले आर्सेनिक अल्बम-30 हे औषध आज साळी वाडा, प्रतापनगर, दुरदर्शन केंद्र, न.पा.समोरील भाग, तांबेपुरा, पैलाड, सानेनगर,
आमलेश्वर नगर, इस्लामपुरा या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये एकुण जवळपास 7000 कुटुंबीयांसाठी जवळपास 150 स्वयंसेवकांमार्फत आर्सेनिक अल्वम-30 हे औषध वाटप करणेत आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button