मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने रमज़ान ईद पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर कोणतेही दुकाने उघडू नये…
अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने कोरोना व्हायरस चे संसर्ग होऊ नये म्हणून रमज़ान ईद पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सोडून इतर कोणत्याही दुकाने उघडू नाही असे लेखी निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले.
शहरातील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहेत की संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाचे संक्रमण देशा सह आपल्या शहरा पुढे येऊन उभे टाकणे असून जवळपास शेकडोंच्या वर संक्रमित रूग्ण शहरात आढळून आले आहेत व कोरोना मुळे अनेक लोकांचा मृत्यू देखील झाले आहे सत्य परिस्थिती प्रशासन व शहरवासीयांचा लक्षात असुन महोदयांनी येत्या २५ मे रोजी आम्हा मुस्लिम धर्मियांच्या पवित्र ईद सन संपन्न होणार असून त्यामुळे शहरातील कपडे, चप्पल, जुते, सौंदर्य, प्रसाधने यांची खरेदीसाठी मुस्लिम बांधव आणि बघिनी तरूण तरूणी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी साठी निघण्याची दाट शक्यता असून गर्दी मुळे शहरात कोरोना संक्रमण तीव्र गतीने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कपडे चप्पल जुते सौदर्य प्रसाधने सह आदि दुकाने सुरू करण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती चे लेखी निवेदन देण्यात आले आहेत सदरील निवेदनावर फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज मौलाना, सत्तार मास्टर, हाजी कादर जनाब, खालीद शेख, शराफत अली सैय्यद, जाकिर शेख, शेरखान पठान,अँड शकिल काझी, कमालोदीन, आरिफ खाटिक, रईस शेख, राजु शेख, आदींची स्वाक्षरी आहे.






