Amalner

?️  दिलासादायक बातमी ..अमळनेर येथील 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह…

?️ दिलासादायक बातमी ..अमळनेर येथील 41 जणांचे अहवाल निगेटिव्ह…

नूरखान

अमळनेर-

शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी 41 अहवाल तपासणी साठी गेले होते. आज एकाचवेळी 41 जणांचे अहवाल प्राप्त होऊन हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने अमळनेरकराना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी एकाच वेळी 38 जणांची कोविड केअर सेंटर येथून मुक्तता करण्यात आली आहे.

यावेळीं आ.अनिल पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,व न प चे संजय चौधरी उपस्थित होते.सुटका झालेल्या ना सॅनिटायझर व मास्क वाटप केल्यानंतर काही सूचना देत त्यांना घरी सोडण्यात आले.

अमळनेर येथील अजुन 26 अहवाल प्रलंबित असून ते अहवाल देखील लवकरच प्राप्त होतील .
दरम्यान जनता कर्फ्युत आता शिथिलता आणली असली तरी नागरिकांनी अजूनही कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button