?️ Big Breaking..जळगांव नाबाद 124..अमळनेर नाबाद 68…
जळगाव जिल्ह्यात आणखी 10 कोरोना बाधित रूग्ण
कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 124
जळगाव- जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील एक तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव ) येथील दोन रूग्ण असे एकूण दहा रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 124 इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.






