?️ Big Breaking…कोरोना अपडेट..ओ मनी माय…अमळनेर मध्ये 67 रुग्ण
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार 21 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आणि अमळनेर शहराने शंभरी गाठली आहे.
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात सर्वाधिक 225 व्यक्तींचे नमुने घेतले त्यात परवा 18 आणि काल 7 अधिक 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत
रात्री उशिरा सापडलेले 21 रुग्ण अमलेश्वर ,माळीवाडा आणि इस्लामपुरा भागातील आहेत.
सर्वाधिक चाचणी अमळनेर शहरात घेतली जात असल्याने रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे डॉ संदीप जोशी , डॉ प्रकाश ताळे , डॉ राजेंद्र शेलकर , डॉ विलास महाजन , डॉ गिरीश गोसावी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत मेहनत घेत आहेत त्यांच्या मदतीला डॉ जी एम पाटील , डॉ नितीन पाटील , डॉ निखिल बहुगुणे , डॉ प्रशांत शिंदे , डॉ अविनाश जोशी , डॉ अनिल शिंदे , डॉ दिनेश पाटील , डॉ हेमंत कदम , डॉ चौधरी यांच्यासह काही डॉक्टर मदतीला धावले आहेत धोका पत्करून डॉक्टर काम करत आहेत.
घरात बसा कडकडीत बंद पाळा
आज 99 लोकांचे नमुने जातील आणि पुन्हा काल रात्री सापडलेल्या 21 लोकांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेतले जातील त्यामुळे ही साखळी थांबवायची तर डॉ ना मदत करा घरी रहा..सुरक्षित रहा.….






