अमळनेर अधिकाऱ्यांची भेदभावाची वागणूक..छोटे भाजी फळ विक्रेते यांच्या वर कायद्याचा बडगा मोठे मासे सुरक्षित…
हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब जनतेवर धाक दाखवून रोजी रोटी हिसकविणारे अधिकारी आणि कर्मचारी मोठया बेकायदेशीर सामग्री साठा करून ठेवणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.
अमळनेर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. अमळनेर प्रशासन मात्र लहानसहान विक्रेते आणि दुकानदारांवर नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या अधिकारी पदाचा गैरवापर करत मेरी मर्जी प्रमाणे किरकोळ गरीब विक्रेत्यांवर धाकट दपशा करून अंगावर हात उचलून जबरदस्तीने मोजमाप करायचे काटे उचलणे,मेहनतीने पैसा खर्च करून आणलेला भाजी,फळे,इ चिरडून टाकत नुकसान करत आहेत. रीतसर मालाची चौकशी करून बेकायदेशीर असेल तर पावती फाडण्याची आवश्यकता आहे.
परंतु कोणत्याही विक्रेत्याच्या रोजी रोटी असलेल्या वस्तू नगरपरिषद कर्मचारी कोणत्या अधिकारात जमा करतात.आज दि 188 प्रमाणे दोन गुन्हे दाखल एका गुन्ह्यात 16 आरोपी दुसऱ्या गुन्ह्यात 8 आरोपी एकूण 24
घटनास्थळ पैलाड भागात 16 गांधली पुरा भागात 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हो तंबाखू दुकान सुरू असल्याचा फोटो आपण पाहत आहेत तो आजचाच असून सदर फोटो अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. तसेच भ्रमण ध्वनी वरून माहिती देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही.30 एप्रिल नंतर
अमळनेर नगरपरिषदेने बॅरियर्स लावलेल्या भागात देखील दुकाने सुरू आहेत. कितीतरी दुकानदार तंबाखू घुटखा सारख्या बेकायदेशीर वस्तू विकत आहेत.विषेश म्हणजे मोठ्या दुकानदारांवर कायद्याचा बडगा चालविला जात नाही असे निदर्शनास आले आहे.सर्व भाजी आणि फळ विक्रेते जेरीस आले असून एकाच गोष्टी वर विशेषतः अमळनेर नगरपरिषद कार्यवाही करत असल्याच्या भावना भाजी आणि फळ विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.






