Amalner

?️ कोरोना हॉटस्पॉट अमळनेरला गोक्षेत्र प्रतिष्ठान तर्फे लॉकडाऊनमध्ये २ लक्ष ६९ हजार लोकांना अन्नदान! ३ मे नंतर अन्नछत्रासाठी आर्थिक अडचणीचे आव्हान..

?️ कोरोना हॉटस्पॉट अमळनेरला गोक्षेत्र प्रतिष्ठान तर्फे लॉकडाऊनमध्ये २ लक्ष ६९ हजार लोकांना अन्नदान!

३ मे नंतर अन्नछत्रासाठी आर्थिक अडचणीचे आव्हान

अमळनेर येथिल गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अमळनेर शहरात कोरोना साथीत लॉकडाऊनच्या दोन टप्प्यात विक्रमी अश्या दोन लक्ष एकोनसत्तर हजार गरीब,गरजूंना लोकांना आजपर्यंत अन्नदान केले गेले आहे.गोशाळेच्या अन्नक्षेत्र कार्याची दखल जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आजी माजी आमदार,नगराध्यक्षा आदिंनी कौतुकास्पद पत्र देऊन घेतली आहे तर साई निर्मल फाउंडेशन ने नुकताच कर्मवीर कोरोना योद्धा संस्था पुरस्काराने ई-सन्मान जाहिर केला आहे.अन्नक्षेत्र उपक्रम सार्वजनिक मदत निधी उभारून आणि वर्धमान संस्कार धाम मुंबई च्या सहकार्याने ३ मे पर्यत सुरू आहे मात्र पुन्हा १७ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर झाल्याने गोशाळा व सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांपुढे २० केंद्रावर ११ हजार लोकांसाठी अन्नक्षेत्र सुरू ठेवण्यासाठी मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले असून आता प्रशासन व दात्यांसह विप्रो कंपनीकडून अपेक्षा आहे.

जळगांव जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वर्धमान संस्कार धाम मुंबई व गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या अन्न दानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले आहे.

लॉक डाऊन वाढल्याने पुढील काळात आपले सेवा कार्य असेच सुरू ठेवावे अशी विनंती ही केली आहे.कोरोना १९ साथीच्या काळात सर्वसामान्य ६ हजार गरजू नागरीकांना रोजचे स्वादिष्ट भोजन देणे हि ईश्वर सेवा असून ह्या स्तुत्य उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री या नात्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहे.तर मुलाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक दिवसाचा अन्नदानाचे खर्चही दिला

खासदार उन्मेष पाटिल यांनी ही प्रत्यक्ष भेट देऊन जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे अन्नछत्र अमळनेर ला यशस्वीपणे श्रीमती भानूबेन शहा गोशाला व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सुरू असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पत्र देत या कार्याचा गौरव करतांना म्हटले आहे की,निस्वार्थ व निष्काम भावाने ,शिस्तबद्ध पद्धतीने जेवण तयार करून तितक्याच समर्पण भावनेने गोरगरीब लोकांच्या घरापर्यंत पोहचते तेव्हा त्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद व ते देत असलेले आशीर्वाद पाहून इथं भगवान महाविर यांचा वास आहे असे वाटते.वर्धमान संस्कार धाम व श्रीमती भानूबेन शहा गो शाळा यांनी केलेली मदत आजन्म लक्षात राहील.
आ.अनिल भाईदास पाटिल ,आ.स्मिताताई वाघ यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन अन्नक्षेत्र कार्याचा गौरव केला आहे.
मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ पुष्पलता पाटील यांनीही गोशाळेस आणि अन्नक्षेत्राच्या विविध केंद्रांवर भेटी देऊन ,एक दिवसाच्या भोजन खर्च,तेल आणि आर्थिक मदतीसह ,अन्नक्षेत्र मुळे हॉटस्पॉट असलेल्या अमळनेर शहरातील हजारो गरीब कुटुंबांचे पोट भरत असल्याने लॉक डाऊन यशस्वी होत आहे त्यामुळे कोरोना शहरात पसरू नये म्हणून संस्थेचे व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे अशी भावना व्यक्त केली आहे.

तर मा.आ.शिरीष चौधरी यांनीही आर्थिक सहकार्य करून अन्नक्षेत्र कार्याला पाठबळ दिले. तहसीलदार मिलिंद वाघ,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे ,यांनीही या कार्याची दखल घेत प्रशासनिक पातळीवर सहकार्य केले आहे.
५ एप्रिल पासून सलग अन्नदानाचे कार्य २० केंद्रावर सुरू असून गोरगरिबांना अखंडित सेवा देतांना गोशाळेस वर्धमान संस्कार धाम मुंबई च्या पाठबळासोबतच समाजातून अनेक स्तरातून मदत मिळत होती. माझं गाव माझं अमळनेर व्हाट्सअप्प ग्रुप,पटवारी फ्रेंड्स ग्रुप ,पु.सानेगुरुजी शिक्षक विचार मंच,प्रताप हायस्कूल १९९४ माजी विद्यार्थी ग्रुप,पाटील गढी,अश्या सोशल मीडियावर असलेल्या ग्रुपनेही आर्थिक सहकार्य केले तर अमळनेर,मंगळग्रह मंदिर संस्थान,गजानन महाराज मंडळ,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर तालुका स्वस्थ धान्य दुकांदारांनीही एक दिवसाचा अन्नदानासाठी पुढाकार घेतला होता तर व्यक्तीशः मा आ कृषिभूषण साहेबराव पाटिल, रामभाऊ संदांनशिव,डॉ अनिल शिंदे,डॉ मयुरी शिंदे,डॉ संदिप जोशी,यांच्या मेडिकल फाउंडेशन ने,न प गटनेते प्रविण पाठक यांनीही मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदानात योगदान दिले.नगरसेवक नरेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील,प्रा गणेश पवार,सुनिल चौधरी,उद्योजक सरजू सेठ गोकलानी,निरज अग्रवाल, पोलिस निरीक्षक कपिल कदम,सतिष संभाजी कदम,विपुल गारमेंट्स, रमेश शेठ जीवनानी, आदिंनी धान्य-वस्तुरुपाने तसेच रोखीने तर भारत गॅस,इंडियन गॅसचे दिनेशभाई यांनी गॅस सिलिंडर चे सहकार्य केले आहे.तर काशिनाथ चौधरी यांनी गाडी अन्न पोहचविण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठान मदत म्हणून दिलेली आहे.या स्वेच्छा दान निधीच्या बळावर ३ मे पर्यंत अन्नक्षेत्र सुरू ठेवले आहे. मात्र यापुढे लॉकडाऊन चा तिसरा टप्पाही जाहीर झाल्यामुळे १७ मे पर्यंत अन्नक्षेत्र सुरू ठेवून लॉक डाऊन मध्ये गोरगरिबांना भोजन पोहचविण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे.आता गोक्षेत्र प्रतिष्ठाण ला प्रशासनासह अमळनेररातील दाते आणि दातृत्वासाठी विप्रो कंपनी कडून मदतीची अपेक्षा आहे तर मदतीसाठीचा पत्रव्यवहार विप्रोशीही संस्थेने केलेला आहे.असे गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानूबेन शाह गोशाळेचे संचालक चेतन शहा ,राजू सेठ ,चेतन सोनार,महेंद्र पाटिल आदिंसह प्रा अशोक पवार,संदिप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,डी ए धनगर ,आदिंसह कार्यकर्ते गोपाळ कुंभार,संजय धनगर,रोहित सोनार,उमेश सोनार,राहुल चौधरी, मनोज चौधरी आदिंनी सांगितले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button