विद्यार्थी व पालकांच्या मदतीला धावले भुषणसिंहराजे होळकर
दत्ता पारेकर
पुणे :भारतात कोराने थैमान घालायला सुरुवात केल्यावर लॉकडाउन २२ मार्च ला लॉकडाउन झाले आणी गाव तालुका जिल्हे राज्य यांच्याही सीमा बंद झाल्या
धनाजी पारेकर हे आपला मुलगा ऋगवेद व मुलगी प्रगती व अर्चना डोके या त्यांचा मुलगा श्रेयस यांच्या सोबत राजस्थान कोटा येथे शिक्षणासाठी राहत होते मुलांचे शिक्षण संपले पंरतु लॉकडाउनमुळे तेथे ते अडकुन पडले होते त्यामुळे त्यांना गावी येता येईना गावी नातेवाईक ही काळजीत होते वरचेवर कोरोनाचा प्रसार वाढतच चालला होता. त्यामुळे ते चिंतेत होते परंतु परराज्यात ना कोणी ओळखीचे, ना कुणाचा आधार. घरी कसे पोहचायचे या विवंचनेत ते सापडले होते त्या पालकांच्या मदतीला अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर धावूनआले. त्यांनी सर्व प्रशासकीय कागदपत्रची पुर्तता करून या ५ जणांना इंदापूर जिल्हा पुणे येथे सुखरुप येण्यासाठी मोलाची मदत केली..






