कोरोनाच्या लढाईसाठी डॉ.झाले सज्ज..डॉ ताडे यांनी स्विकारले आव्हान
नूरखान
अमळनेर प्रताप महाविद्यालयातील महिला वसतिगृहात कोव्हीड 19 सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी 39 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
येथे संशयित रुग्ण व पॉझिटीव्ह मात्र लक्षणे नसलेल्या व्यक्तींना यापुढे दाखल करण्यात येणार आहे. तसेच ताप व खोकला या रुगांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रांचे आव्हान डॉ प्रकाश ताडे यांनी स्वीकारले असून त्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
हे केंद्र 24 तास सुरू असून अत्यावश्यक सेवा याठिकाणी देण्यात येणार आहे. तीन पाळ्यांमध्ये सहा डॉक्टर आणि सहा परिचारिका नियुक्त करण्यात आले आहेत. महिला वस्तीगृहाच्या कॉमन हॉलमध्ये बाह्यरुग्ण तपासणी गृह तयार करण्यात येणार आहे. सर्वांसाठी एन 95 मास्क, पीपीई किट उपलब्ध असून त्यांना सॅनिटाईझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रत रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात येणार असून सर्व साहित्य उपलब्ध आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या तयार केल्या असून दिवसभरात याठिकाणी तीन वेळा फवारणी येऊन परिसर आणि सॅनिटायझ करण्यात येत आहे.
रुग्णांसाठी पाणी ,वीज ,जेवणाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. 200 खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर दहा खाटा पॉझिटीव्ह रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील 24 स्वॅब तपासणीसाठी धुळे प्रयोगशाळेत रवाना करण्यात आलेले आहेत.स्वॅब तपासणीसाठी जळगांव किंवा धुळे येथे संशयित लोकांना पाठवावे लागत होते आता अमळनेर येथेच स्वतंत्र स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे.
इतर उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालय सेवा पुरवत आहे. तज्ञ डॉक्टर नसल्या कारणाने येथील कुल रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथील रुग्णांची भेट घेऊन जळगाव पेक्षा याठिकाणी चांगली सेवा गरजूंना उपलब्ध झाली आहे त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये स्वतःचे रक्षण योग्यप्रकारे होईल व कोरोनावर मात करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हे आव्हान स्थानिक डॉक्टरांनी स्वतःचा स्वीकारल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. गंभीर परिस्थितीत डॉ नी घेतलेली ही जबाबदारी निश्चितच कौतुकास्पद आहे.तालुक्यातील 18 कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील पॉझिटीव्ह निगेटिव्ह असे दोन विभाग तयार करण्यात आलेले आहेत.






