Erandol

एरंडोल येथे अमळनेर वरुन अप डाऊन करणाऱ्या नगर पालिका अधिक्षकाकडून कोरोना होण्याची भीती -राहुल पाटील

एरंडोल येथे अमळनेर वरुन अप डाऊन करणाऱ्या नगर पालिका अधिक्षकाकडून कोरोना होण्याची भीती -राहुल पाटील

विक्की खोकरे प्रतिनिधी

एरंडोल – येथील नगर पालिकेत कार्यरत असलेले नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ हे अमळनेर येथील रहिवासी असुन ते दररोज अमळनेर येथुन एरंडोल येथे अपडाऊन करतात त्यामुळे एरंडोल शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असे निवेदन एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांचे मार्फत जिल्हाधिकारी जळगाव यांना एरंडोल येथील रहिवासी राहुल रघुनाथ पाटील यांनी दिले आहे.

निवेदनात राहुल पाटील यांनी एरंडोल नगर पालिका येथे संजय दगडू ढमाळ हे कार्यालय अधिकक्षक पदावर कार्यरत असून यांच्या कडे कोरोना विषाणू काळात एरंडोल शहराची महत्वाची जवाबदारी असून आपणस या निवेदनाद्वारे विनती कि काही दिवसा पासून न्यूज पेपर व विविध बातम्या मधून असे वाचायला मिळत आहे कि आपल्या जिल्ह्यातील अमळनेर शहरात व तालुक्यात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

अश्या परिस्थिती मध्ये एरंडोल नगर पालिका येथे कार्यरत असेले संजय ढमाळ हे कार्यालय अधिकक्षक म्हणून प्रशासनाची महत्वाची जवाबदारी च्या कामासाठी अमळनेर येथून दररोज प्रवास करत आहे.यांचे निवास स्थान अमळनेर येथे असल्याने यांना दररोज प्रवास करावा लागतो परंतु अमळनेर ची परिस्थिती बघता संजय ढमाळ यांचा प्रवास करणे धोक्याचे व यदा कदाचित याच्या मार्फत कोरोना विषाणू एरंडोल नगर पालिकेत कर्मचारी व यांच्या संपर्कात येत असलेले पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या मार्फत संसर्ग गावात पसरण्याचे नाकारता येत नाही. तरी आपणस विनती आहे कि श्री. संजय दगडू ढमाळ हे कार्यालय अधिकक्षक यांना काही दिवस एरंडोल शहराची महत्वाची जवाबदारी असल्याने यांना येथील शासकीय निवास स्थान किवा त्याच्या सोई प्रमाणे निवासा बाबत आदेश पर सूचना देण्यात याव्यात असे म्हटले आहे.

सदर निवेदन राहुल पाटील यांनी प्रांताधिकारी एरंडोल यांचे सोबतच,तहसीलदार एरंडोल, एरंडोल पोलीस निरीक्षक ,मुख्याधिकारी एरंडोल नगर परिषद एरंडोल यांना देखील दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button