जिल्हा रुग्णालयात दाखल अमळनेर येथील कोरोनाबाधित ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात आता पर्यंत कोरोनाचे पाच मृत्यू झाले आहेत त्यातील चार अमळनेर तालुक्यातील आहेत.
जिल्हा रुग्णालयात दाखल अमळनेर येथील कोरोनाबाधित ६६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला असून अमळनेरातील कोरोनाचा चौथा बळी
शव अमळनेर येथे आणण्यास मज्जाव…
जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल अमळनेर येथील कोरोनाबाधित ६६ वर्षीय वृध्दाचा
रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अमळनेरातील कोरोनाचा हा चौथा बळी असुन जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या पाचवर पोहचली आहे.
अमळनेरातील शाहआलम नगरातील या वृध्दाला २४ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला ह्रदय विकार होता. दि २६ रोजी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. तपासणी अहवालानंतर त्याचा रात्री ११ वाजेच्या सुमारास मृत्यु झाला.
जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अमळनेरातील १३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच
जिल्ह्यात आतापर्यंत
कोरोनाने पाच बळी गेले आहेत. त्यात अमळनेरातील चार जणांचा समावेश आहे, अशी
माहिती अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.






