अमळनेर अमलेश्वर नगर येथील 11 व्यक्ती तपासणी साठी जळगांव ला रवाना
अमळनेर
अमलेश्वर नगर येथील काल रात्री उशिरा एका व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्या मुळे अमळनेर मध्ये कोरोना बाधित व्यक्ती ची संख्या 4 झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज अमळनेर येथील अमलेश्वर नगर भागातील मृत व्यक्तीच्या संपर्कात असलेले आणि आजूबाजूचे असे एकूण 11 हाय रिस्क असलेले लोक जळगांव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ ताळे यांनी दिली आहे.
कॅटेंटमेंट एरियातील 2954 घरांचा सर्वे झाला असून एकूण लोकसंख्या 11700 एव्हढी आहे.या सर्व घरांचा आशा वर्कर्स आणि परिचारिका सर्वे करत केला जात आहे.सर्वे करण्यासाठी 22 टीम कार्यरत आहेत.एका टीम मध्ये 2 वक्ती एक परिचारिका आणि एक आशा वर्कर कार्यरत आहेत.
या भागात एकूण 4000 घरे असून आता 3 की मी चा परिसर सील करण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ ताळे यांनी दिली आहे.






