?️ अमळनेर येथील साळी वाडा भागातील मृत महिलेचा आणि तिच्या पतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…
एक किलोमीटर चा भाग होणार सील….
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या अमळनेर येथील कोरोना संशयित रुग्णांपैकी दोन रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे.
या कोरोना बाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय अमळनेर येथील महिलेचा आधी रुग्णालयातच मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
अमळनेर येथील साळी वाडा भागातील हे दोघेही राहणारे आहेत. दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अमळनेर येथील प्रशासन हादरले असून अधिकाऱ्यांची मिटिंग सुरू आहे. प्रशासनाने या आधीच या भागामध्ये खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जनतेने घाबरून न जाता घर सोडून बाहेर जाऊ नये, स्वच्छता बाळगावी, मानसिक तंदुरुस्त राहावे, अफवा पसरवू नयेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ राजेंद्र शेलकर डॉ प्रकाश ताळे, डॉ जी एम पाटील यांनी केले आहे.
अमळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या आता 3 झाली असून सर्वत्र काळजी व्यक्त होत आहे. साळी वाडा हा भाग दाट वस्तीचा असल्याने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. येथे घरे जवळ जवळ असून लागण होण्याचे अधिक प्रमाण होऊ शकते.
कोरोना आपल्या घरात आला आहे आता तरी अत्यन्त काटेकोर बंद पाळावा व सर्वानी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन ठोस प्रहारच्या सर्व प्रतिनिधी करत आहेत.






