लॉक डाऊन मध्येही दिवा बत्ती वविभाग देत आहे सेवा
अमळनेर :
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात देखील हीच परिस्थिती आहे. त्यात संपूर्ण देशाच्या मानाने महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. प्रत्येक शासकीय विभाग ज्याच्या त्याच्या पद्धतीने कार्य करीत आहे.
या कोरोनाविरुद्ध लढ्यात देशातील महसुल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, यांचा खुप मोलाचा वाटा आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अमळनेर नगर परिषदेचा दिवा बत्ती विभाग देखील मोलाचे कार्य करीत आहे.
लॉकडाऊन काळात कोठेही अडथळा न येऊ देता शहरात उजेड देण्याचे कार्य यांच्या माध्यमातून सुरू आहे. दिवाबत्ती विभागाचे अधिकारी व कर्मचारी विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर , रवी उदयवाल यांच्या मार्गदर्शनाने सुपरवायझर ओम कोळी सोबत नासिर शेख, बाळू माने, दीपक मद्रासी, युनूस पठाण, आदिल शेख, आबीद शेख हे रात्रंदिवस राबत आहेत. म्हणून आज म्हणून आज अमळनेर शहर उजेडात आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही






