?️ Big Breaking अमळनेर वासीयांनो सावधान कोरोना पोहचला घरात….
नूरखान
अमळनेर :
तालुक्यातील मुंगसे या गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला जळगाव जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल झाली होती. मात्र शनिवारी या महिलेचा रिपोर्ट आल्यावर ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.सदर महिला मुंगसे ता अमळनेर येथील असून तिला कोणतीही परदेशी हिस्ट्री नाही.ती कोणाच्या संपर्कात आली आणि आतापर्यंत गावात कोणी या महिलेच्या संपर्कात आल्या मुळे बाधित झाले आहे का याची चौकशी केली जात आहे.
पुढील कार्यवाही साठी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग झाली असून तसेच मुंगसे गावाच्या आजूबाजूचे 7 किमी अंतरावरील चारही गाव सील करण्यात आली आहेत. त्या चारही गावांमध्ये रात्रीच फवारणी झाली असून 19 रोजी सुमारे 8 वैद्यकीय पथक जाऊन त्या गावांमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान या बाबत संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्याला जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आले आहे.






