चंद्रे येथे अनंतशांती संस्थेमार्फत मोफत मास्कचे वाटप
कोल्हापूरः आनिल पाटील
कोरोना ह्या महामारीमुळे सगळीकडे नैराश्य व भितीचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी ग्रामीण जनतेला हवे ते हवे तसे मार्गदर्शन मिळत नाहि शिवाय जरी मार्गदर्शन मिळाले तरीहि ग्रामीण व डोंगरी दुर्गम भागातील जनता आर्थीक अडचणीमुळे त्या नियमांचे पालन करु शकत नाहि. शिवाय अन्न, वस्ञ ,निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा ह्या ग्रामीण जनता कृषी उत्पनावर पुर्ण करत आसते परंतु या पुर्ण करतांना कृषी उत्पादक आपल्या वयक्तीक शरीराकडे किंवा आरोग्याकडे गरजे इतके लक्ष देवु शकत नाहि याचा आढावा घेवुन अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने क्रुशी उत्पादक भाजी पाला विक्रते लोकांना चंद्रे येथे मास्क वाटप पञकार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी भगवान गुरव आप्पासाहेब पाटील निशांत पाटील अनिल हळदकर प्राचार्य एन डी पाटील संतोषा पाटील औवधुत पाटील दयानंद हळदकर विनायक हळदकर संग्राम पाटील मोहन साठे जगान्नाथ नाईक समिर पाटील आर एस मोरे उपस्थीत होते.






