अमळनेर येथे आरोपीचा खूनअमळनेर :अमळनेर शहरात धक्कादायक प्रकार…वाढत्या गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर एका मागोमाग गुन्हगारांचे खून किंवा त्यांच्या वर हल्ले झाल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.
आज शहरातील बंगाली फाईल भागात एका गुन्हेगाराचा खुन झाल्याची घटना आज आठ वाजेच्या सुमारास खून झाला आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले असून पुढील कार्यवाही सूरु आहे. राकेश वसंत चौहान हा गुन्हेगार होता. त्याच्यावर 10 गुन्हे दाखल होते. तो सध्या जळगांव जेल मधून 2 दिवसांपासून बाहेर आला होता.पण तो अमळनेर मध्ये आला कसा आणि काय घडले असावे असे अनेक प्रश्न उपस्थितांच्या मनात आहे.उशीरा पर्यंत तपास यंत्रणा कार्यरत असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत .घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,अमळनेर पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे, अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,तसेच पोलीस ना शरद पाटील इ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.






