प्रतिनिधी संदीप चव्हाण
अमळनेर:-तालुक्यात मुडी येथे ग्रामस्थरीय गावात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून जनजागृती करतांना आढळुन आलेल्या ग्रामस्थांना होम शिक्के मारणे सुरू असल्याचे आरोग्य विभाकडून सांगण्यात आले वैदयकीय अधिकारी एम आर धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ मनीषा परदेशी व आशा सेविका उषा सुर्यवंशी यांनी गावात घरोघरी जाऊन तपासणी केली बाहेरून आलेल्या नागरिकांच्या डाव्या हातावर शिक्का मारून घराबाहेर जाऊ नका असा सल्ला देत 70 नागरिकांची नोंद करण्यात आली असल्याचे मनीषा परदेशी यांच्या कडून सांगण्यात आले.






