Amalner

अमळनेर येथील सबगव्हाण मधील बाहेर गावाहून आलेल्या 42 लोकांच्या मनगटावर बसला होम कोरोंटाईन चा शिक्का

अमळनेर येथील सबगव्हाण मधील बाहेर गावाहून आलेल्या 42 लोकांच्या मनगटावर बसला होम कोरोंटाईन चा शिक्का

अमळनेर तालुक्यातील येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांची तपासणी करीत बाहेर गावावरून आलेल्या ४२ लोकांच्या हातावर होम कॉरोटाईन चा शिक्का मारण्यात आले,

सविस्तर माहिती अशी की, सबगव्हाण चे सरपंच नरेंद्र पाटील व आरोग्य सेवक दीपक पाटील, नर्स सुवर्णा धनगर,आशा सेविका रुपाली पाटील, अंगणवाडी ताई छोट्याबाई भिल,पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील,श्रीराम पाटील,कैलास पाटील, संतोष पाटील,सुरेश पाटील,वासुदेव पाटील बाळू पाटील,यांच्या उपस्थितीत कोराना विषाणू आजारा विषयी आरोग्य शिक्षण देऊन होम कॉरोटाईन चा शिक्का बाहेर गावाहून आलेल्या 42 लोकांना उजव्या हाताच्या मनगटावर अंगणवाडी मध्ये मारण्यात आला व त्यांनी घरात 14 दिवस थांबावे व गर्दी च्या ठिकाणी बाहेर जाऊ नये ही विनंती करण्यात आली, या वेळी कोरोना विषाणू विषयी माहिती पत्रक, मास्क वाटण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button