शिरूड येथील जनता कोरोना कर्फ्यु पालन करत दिला उत्तम प्रतिसाद
रजनीकांत पाटील
अमळनेर: तालुक्यातील शिरूड हे गांव हे दत्तांची पुण्यभूमी म्हणून ओळखले जाणारे गाव
पंतप्रधानांच्या आदेशांनचे पालन करत गावात कोणीच फिरकतांना देसले नाही.गावातील सर्व दुकाने,पानटपऱ्या बंद दिसल्याचे आढळून आले शेतकरी व मजूर यांनी देखील आदेशाला सहकार्य केले.

गावात कामानिमीत्त कोणीनं कोणी येतात गावालगत रस्ता हा वर्दळीचा आहे पुढे कवपिंप्री,सुमठाने,इंधवा, पिंपळकोठा,भोलाने,मुकटी, असुन दुसरा रस्ता हा शिरूड इंधवा,बहादरपूर,शेवगे,पारोळा जात असतो या गावांत जाण्यासाठी शिरूड वरूनच सरकारी व खाजगी वाहने जातात सुमारे हजारो माणसांनपेक्षा ही जास्त वर्दळ येथूनच होत असते. लोकं येथून कामानिमीत्त बाहेर जाता येतात.

आज जनता कर्फ्यु मुळे येथे वांहन तर सोडा माणुसच काय चिटपाखरूंही फिरकत नाही. असा कडकडीत बंद याआधी कधीच झाला नव्हता.
भारतभुमीला सुख,शांती,संपदा व निरोगी दिर्घायुष्यं लाभावे यासाठी आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचा आजचा जनता कर्फ्युचा आदेश सर्व गावकऱ्यांनी मानला.जेणेकरून ह्या देशातुन कोरोना विषाणुला हद्दपार करता येईल.
व आपणांसर्वांना चांगले आरोग्य मिळेल,यासाठी सर्वांनी मिळुन गावकऱ्यांनी चांगला प्रयत्न केले. हस्तांदोलन न करता सर्वच ठिकाणी स्वतःहुन स्वच्छता ठेवली.






