जनता कर्फ्यूला उस्फूर्तपणे प्रतिसाद द्या – हर्षवर्धन पाटील
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी रविवारी (दि. 22 मार्च) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण भारतभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी 100 टक्के सहभागी होऊन उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचे संकट दूर करणेसाठी प्रत्येक नागरिकाने संयम पाळत एकजुट ठेवणे आवश्यक आहे.कोरोना व्हायरस संदर्भात जनतेने घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, त्याकरिता सर्व जनतेने रविवारी दिवसभर घरी थांबून स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू मध्ये सहभागी व्हावे, त्यातच सर्वांचे हित आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ज्या सूचना देत आहे, त्याचे जनतेने तात्पुरता त्रास सहन करून पालन करणे गरजेचे आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूंची लागण झालेली व्यक्तींची संख्या वाढत चालली आहे.समाजातील 65 वर्षावरील वृद्धांना कोरोना विषाणूंची लागण सहजपणे होऊ शकते, त्यामुळे वृद्धानी घराबाहेरच गर्दीत जाणे टाळावे. सध्या प्रत्येक नागरिकाने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वयंशिस्त लावून स्वच्छतेची काळजी घ्यावी,त्यामुळे लवकरच कोरोनाचे संकट निश्चितपणे दूर होण्यास मदत होईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद के






