Pune

कंपन्या बंद न ठेवणाऱ्या मालकांना, मॅनेजरला पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा” -रूपाली ठोंबरे

कंपन्या बंद न ठेवणाऱ्या मालकांना, मॅनेजरला पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा” -रूपाली ठोंबरे

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्वाच्या शहरात अंक्षतहा: लॉकडाऊन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र काही व्यावसायिक, कंपनीचे मालक आणि मॅनेजर बंद न करता कंपन्या चालू ठेवत आहेत. अशांवर कारवाई करण्याचं आवाहन मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केलं आहे.
पुण्यातील हिंजवडी, खराडी ,वाघोलीमध्ये काही कंपनी मुदाम चालू ठेवल्या आहेत. 300 ते 800 लोक काम करत आहे .कंपनी त्वरित बंद करा असं आवाहन ठोंबरे यांनी केलं आहे.

ज्या कंपन्या बंद केल्या जात नाहीत त्या ऐकत नसतील तर जो मालक, मॅनेजर,ग्रुप लीडर त्यांना पकडा आणि कोरोना पेशंट जवळ बसवा, असं ठोंबरे यांनी केलं आहे.
दरम्यान, सरकारी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यावरुन 25 टक्क्यावर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना जे शक्य नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत,असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button