शिरूड येथील अंगणवाडी अजूनही सुरू… लहान मुले अजूनही जात आहेत अंगणवाडी शाळेत…एकात्मिक बालविकास विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष…
अमळनेर रजनीकांत पाटील
अमळनेर शिरूड येथील अंगणवाडी सुरू असून शाळेत लहान लहान मुले आजही जात असल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, शिक्षण अधिकारी, यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत एकात्मिक बालविकास विभागाला आता अचानक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची,अभ्यासाची मोठी काळजी असल्या सारख दाखवत अंगणवाडी सुरू ठेवल्या आहेत.विशेष म्हणजे कोणतेही प्रोटेक्शन ,मास्क,रुमाल किंवा इतर काळजी अंगणवाडी सेविका घेत असल्याचे फोटो मध्ये तरी दिसून येत नाही.
संपुर्ण जग कोरोना व्हायरस ने हैराण होत असतांना त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकार घेत असलेल्या सावधागीरी च्या कारवाईला सहकार्या करण्याचे सोडुन ते नियम मोडण्यात धन्यता माननारे काही महाभाग (विभाग) आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शाळा, काँलेजेस, अंगणवाडी , माँल्स् , चित्रपटगृहे बंद केलीत.गर्दीची ठीकाणे टाळावीत म्हणुन सुचना दिल्यात.जिल्हाधिकारी यांनी जळगांव जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाणार नाहि याची काळजी घेण्याविषयी वारंवार अवाहान केले.परंतु हे सर्व आदेश झुगारून शिरूड येथिल एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्या सुरूच आहेत.यांना बंद करण्याचे आदेश वरिष्ठांकडुन अद्याप मिळाले नाहित काय?लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कोण करणार? असा प्रश्न गांवकरी ऊपस्थित करतांना दिसुन येत आहेत.






