माणुसकी आहे जिवंत – यशराज थोरात
खोपोलीकरांनी दिला डिफेन्समध्ये कार्यरत असणाऱ्या यशराज थोरातांना मदतीचा हात
कोल्हापूरःआनिल पाटील
कलकत्ता येथील डिफेन्समध्ये कार्यरत असणारे यशराज थोरात हे एक्सप्रेसने मुंबई येथे आले होते. सुट्टीनिमित्त कोल्हापूरच्या पुढे असणाऱ्या आजरा या गावी जाण्याच्या आनंदात होते. घरचे मिळणार याचा आनंद एका बाजूला तर दुसरा आनंद असा होता की ते 28 मार्च रोजी विवाह बंधनात अडकणार आहे ही विशेष बाब. परंतु ट्रेनमध्ये त्यांची एक बॅग चोरीला गेली ज्यात मोबाईल सर्व कागदपत्रे व पैसेही होते, त्यामुळे ते त्रस्त झाले होते. डिफेन्स (Defence) ची करडी शिस्त यामुळे दर मजल करीत हा युवक खोपोली येथे पोहोचला. अनेक गाडयांना लिफ्टसाठी हात देऊनही कुणी थांबायला तयार नाही या भावनेने हा तरुण थोडा त्रासलेला.
याच वेळी खोपोलीमधील रोड वरून जाणारे युवा पत्रकार समाधान दिसले यांनी थांबून त्याची चौकशी केली, हा सर्व प्रकार ऐकल्यावर त्यांनी यशराज थोरातांना नाश्ता व पाणी देऊ केले. मात्र त्यांनी त्यावेळी आपल्याला पुणे येथे जाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली तोपर्यंत तेथे पत्रकार रवींद्र मोरे सुद्धा मदतीला हजर झाले असता यावेळी सहजसेवा फौंडेशन खोपोलीचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांना पुढील मदतीसाठी बोलावले. सदर तरुणास युवा पत्रकार समाधान दिसले व डॉ.शेखर जांभळे यांनी लोणावळा येथील रेल्वे स्थानकांवरून कोयना एक्सप्रेसमध्ये बसवून दिले व डॉ.शेखर जांभळे यांनी पुढील प्रवासासाठी व अधिक खर्चासाठी हवी असणारी रक्कम देऊन रवाना केले. यशराज थोरात यांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदा अश्रू व कित्येकदा मनापासून धन्यवाद देऊन यांनी घरची वाट धरली.
गेले कित्येक तास त्रासिक प्रवासातून खोपोलीकरांनी दिलेल्या मदतीबद्दल यशराज थोरात यांनी समाधान व्यक्त केले, तरीही अजूनही लोक सैनिकी वेशात असताना मागितलेल्या मदतीत साथ देत नाहीत अशी ही खंत थोरात यांनी व्यक्त केली.
भारतीय सैन्यदलात डिफेन्स मध्ये कार्यरत असणारे कोल्हापूर येथील सैनिक यशराज थोरात हे दुरांतो एक्सप्रेसने प्रवास करीत असताना मुंबई स्टेशन येण्यापूर्वी त्यांची प्रवासी बॅग व अन्य साहित्य चोरटयांनी चोरून नेले. यामध्ये रोख रक्कम व मोबाईल सुद्धा होते. हा चोरीचा प्रकार लक्षात आल्या नंतर त्यांनी मुंबई रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात तक्रार ही केली. यानंतर थोरात हे पुण्याला जाता यावं म्हणून त्यांनी खोपोली गाठली. खोपोली येथे त्यांना योगायोगाने येथील पत्रकार समाधान दिसले व मी भेटलो. तसेच सहज फाउंडेशनचे शेखर जांभळे हे सुद्धा तेथे आले. थोरात यांनी सर्व हकीकत सांगितल्या नंतर थोरात यांना लोणावळा येथे सोडून त्यांना लोकल ट्रेन मध्ये बसवून देण्यात आले. तसेच पुढील प्रवासासाठी त्यांना थोडी मदत सुद्धा देण्यात आली.






