?अमळनेर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना द्यावा न्याय..अमळनेरकाल संपुर्ण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी गारपीट झाली.बेधुंद वादळ,गारपिट आणि जोरदार पाऊस यामुळे अमळनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रब्बीच्या हंगामातील सर्व पिके जमिनदोस्त झाली असून अगोदरच आर्थिक मंदीच्या झपाट्यात आणि दुष्काळाच्या सावटाखाली असलेला शेतकरी बांधव पूर्ण पणे हवालदिल झाला आहे. रब्बीच्या हंगामातील सर्व पिके कालच्या पावसाने नष्ट केली आहेत.गहू,बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आंबा जो थोडा फार मोहरला होता सर्व मोहर गळून पडला आहे.







