तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते निवासी उद्योग विकास प्रशिक्षणाचे उदघाटन.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : नॅशनल एससी – एसटी हब आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र उद्योग विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चालू असलेल्या निवासी उद्योग विकास प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी दीपप्रज्वलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळीया कार्यक्रमाचे समन्वयक रामदास पवार, प्रा.तानाजी कसबे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जनता बँकेचे व्यवस्थापक धुमाळ साहेब,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक वसंतराव माळुंजकर, पत्रकार संघाचे सचिव सागर शिंदे,abp माझाचे पत्रकार राहुल ढवळे, लोकमतचे पत्रकार निखिल कणसे, सिद्धार्थ मखरे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.






