वालचंदनगर मध्ये एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर मध्ये एकदिवसीय माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली.
शासकीय व निमशासकीय कामांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते.इतर देशांत कायदा प्रशासनाकडून जनतेवर वचक ठेवत असतो पण आपल्या भारतात संविधानातील घटना त्यातील तत्वामुळे सामान्य प्रशासनातील माहितीचा अधीकार ह्या कायद्यामुळे जनता प्रशासनावर वचक (लक्ष) ठेवण्याचे काम करते.याची स्पष्ट जाणीव माहिती अधिकार कार्यकर्त्यांना या कार्यशाळेतून करुन देण्यात आली.
यावेळी माणुसकी फौंडेशनचे लखीनंदर सोरेन, संग्राम सावंत आणि धम्मपाल अडसुळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना इंदापुर तालुका अध्यक्ष वैभव धाईंजे यांनी केली. तर आभार NDMJ चे इंदापुर तालुका उपाध्यक्ष धनाजी गायकवाड व सचिव बिरु माने यांनी मानले . दरम्यान अँट्रोसीटी कॅलेंडर माहितीपट व मुले वाढवण्याविषयी एका बौद्धाच चिंतन पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यशाळेमध्ये 35 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात अश्वजित कांबळे, बाबा सावंत, घनश्याम निंबाळकर, श्रीपती चव्हाण, नितीन लोंढे, अनिल बागाव, अनिल दनाने, लखन वाघमारे,महेंद्र गायकवाड आणि पूनम निंबाळकर उपस्थित होत्या.






