लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेरात सलग ३७ दिवस सर्वाधिक दिर्घकाळ चाललेले ऐतिहासिक आंदोलन स्थगित
नूर खान
अमळनेर येथिल एन आर सी ,सी ए ए विरोधी धरणे आंदोलन महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या आ.परब समितीच्या निर्णयाच्या अधिन राहून व पोलिस निरीक्षकांच्या आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाचा विचार करून
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अमळनेरात सलग ३७ दिवस सर्वाधिक दिर्घकाळ चाललेले ऐतिहासिक आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
अमळनेरात विविध पुरोगामी, लोकशाहीवादी ,बहुजन चळवळीतील पदाधिकारी, सामाजिक राजकिय कार्यकर्त्यांनी एकत्र येत एन आर सी ,सी सी ए विरोधात मोठे जन आंदोलन उभे केले होते. आंदोलन स्थळी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सतत आंदोलन कर्त्यांच्या संपर्कात राहून कायदा व सुव्यवस्था बाबत चर्चा केली.आंदोलकांशी पोलिस निरीक्षक मोरे यांनी आंदोलन कर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आंदोलन कर्त्यांच्या वतीने लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या कोअर कमिटी चा निर्णय जाहीर करून ३८ व्या दिवसापासून आंदोलन संस्थगित केल्याचे सांगितले.यावेळी प्रा अशोक पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने एन आर सी,सी ए ए बाबत आ.परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधींची समिती नेमली असल्याने ,व मा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आंदोलन संस्थगित करण्याबाबत कोअर कमिटीच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले. याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सांगितले की , अमळनेरात सर्वाधिक दीर्घकाळ सलग ३७ दिवस शांततामय मार्गाने चाललेलं सदरचे लोकशाही बचाव चे एन आर सी विरोधी आंदोलन ऐतिहासिक ठरलेले आहे! यावेळी ऍड.रज्जाक शेख, यांनी ही मनोगत मांडले. राष्ट्रगीत होऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
निवृत्त निवासी जिल्हाधिकारी एच टी माळी, सत्तार मास्टर, फैय्याज पठाण, मा नगरसेवक मुख्तार खाटीक,भागवत पाटील,भरत पवार आदिंसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकशाही बचाव कृती समितीच्या कोअर कमिटी चे सदस्य रामभाऊ संदानशिव, प्रा अशोक पवार,रियजुद्दीन मौलाना, रणजित शिंदे,भारती गाला,ऍड शकील काझी,गौतम सपकाळे,प्रा लीलाधर पाटील,सत्तार मास्टर,ऍड अब्दुल रज्जाक शेख,आदिंनी सदर आंदोलनाच्या बाबत पुढाकार घेतला होता.
यावेळी शफाकत अली,भूषण पाटील,भरत सोनवणे,रमेश घोलप,आबिद अली अहमद अली,अखतर अली,रहीम मिस्तरी,आशम मिस्तरी, शेर खा पठाण, शाहरुख सिंगर, रईस भाई,नुरुद्दीन शेख,इकबाल शेख,खालीक अहेलेकार,सुलतान पठाण,बिस्मिल्ला मिस्तरी, रिसालत टेलर, शाहिद जमाल, अर्षद अली, प्रविण संदानशिव,प्रा.शिवाजीराव पाटील,विश्वास पाटील,विजय गाढे,प्रा.जयश्री साळुंखे, प्रा.जितेंद्र संदानशिव, हाजी मुजफ्फर अली,रमेश घोलप, इमामोद्दीन शेख अहमद, मुश्ताक अली,गयास शे सिराज,तसबुर अली,राजू मिस्तरी,आदिंसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी परिश्रम घेतले.
*१ फेब्रुवारी पासून आंदोलनांतर्गत सुरू होते जन प्रबोधन!*
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या माध्यमातून १ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या धरणे आंदोलनाअंतर्गत नर्मदा बचाव च्या नेत्या मेधा पाटकर, हम भारत के लोक जन आंदोलनाचे योगेंद्र यादव, लोकसंघर्ष च्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या जन प्रबोधन जाहिर सभा घेण्यात आल्यात. हिंदू,मुस्लिम, दलित ,आदिवासीनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन यशस्वी करण्यात आले.तर बहुजन क्रांती मोर्चा चे भारत बंद आवाहनाअंतर्गत अमळनेर बंद करण्याचा शांततामय मार्गाने यशस्वी प्रयत्न करण्यात आला.एन आर सी ,एन पी आर,सी ए ए कायद्यावर डॉ.सुरेश खैरनार यांची कायदेविषयक प्रबोधन कार्यशाळा ही घेण्यात आली होती.तर छ शिवाजी महाराज जयंती,राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती,मौलाना अबुल कलाम आझाद स्मृत्तिदिवस,जागतिक महिला दिवस,असे अनेक कार्यक्रम याच आंदोलन मंडपात विविध वक्त्यांच्या प्रबोधन पर व्याख्यानाने साजरे करण्यात आले.रोज राष्ट्रभक्ती पर गीते आंदोलनात गायिली जात होती.तर राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप होत असे.






