कर्तव्यदक्ष महिला म्हणून श्रीमती शैलेजा खरात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते सत्काराने सन्मानित
दिलीप वाघमारे
लोणंद दिनांक पाच प्रतिनिधी खंडाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती शैलजा बाबासाहेब खरात यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित फलटण येथे केले श्रीमती शैलजा खरात यांचे कार्य खंडाळा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून प्रथम निवड झाली आणि खऱ्या अर्थाने तालुक्यातील दीनदुबळ्या महिलांसाठी झोपडपट्टी पासून उच्चवर्णीय पर्यंत समस्या निवारण करण्यामध्ये अग्रहक्काने सहभागी झाल्या नंतर लोणंद नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाल्या आणि त्या कुटुंबाने 24 तास वेळ देऊन अश्रू पुसण्याचे खऱ्या अर्थाने काम केले अनेक महिलांसाठी विविध मेळावे आंदोलन बैठका विकास कामे धडाडीने करून खंडाळा तालुक्यात विकास कामाचा डोंगर उभा केला काही कुटुंबे तंटामुक्त केले तर काही महिलांना लघु उद्योगासाठी मार्गदर्शन करून कुटुंब उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत केली बहुजन समाजाच्या विकासकामांना अग्रहक्काने सन्मान करून सुजलाम-सुफलाम असा खंडाळा तालुका केला त्यांच्या पुरस्काराने खऱ्या अर्थाने तालुक्याचा मानबिंदू सातारा जिल्ह्यात झेंडा फडकला






