कवपिंप्री वाचनालय बनला जुगाराचा अड्डा
अमळनेर ता कवपिंप्री रजनीकांत पाटील
मनुष्य जीवनातील वाचनाचे फार महत्व आहे. जे वाचतो तेच लिहतो हे कधी विसरत नाही. मानवी जीवनात देवालया इतकेच महत्व वाचनालयाचे आहे. मात्र कावपिंप्री गावात वाचनालया चे एक वेगळे चित्र पहायला मिळत आहे.

कवपिंप्री येथील वाचनालयात लोक पेपर वाचतांना न दिसता मात्र पत्ते खेळतांना लोक नेहमी दिसतात. वाचनालयात पत्त्यांचा डाव मांडला जातो. हे एक वाचनालय चक्क जुगाराचा अड्डा बनल्याचे चित्र दिसत आहे.
वाचनालय हे एक या बाबत गावात कोणीही काही बोलत नाही.कावपिंप्री चे पोलीस पाटील यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?
वाचनायलासारख्या पवित्र वास्तूत जर जुगार खेळला जात असेल तर निश्चित पणे प्रशासन डोळे मिटून बसले आहे. लवकरात लवकर या वाचनालायतील जुगार बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






