प्रताप महाविद्यालय (स्वायत्व) विषय परिपत्रकते नुसार परीक्षा शुल्क माफ करण्याबद्दल…..
अमळनेर रजनीकांत पाटील
आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात ग्रामीण भागातील अर्थिक परिस्थिती आपण परिचित आहोतच तरी महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला असून आपण व आपल्या महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थीच्या हिताचा विचार करून विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क लवकरात लवकर माफ करण्यात यावे. व परिपत्रकाचे उल्लंघन झाले तर विद्यार्थीचा हिता करीता युवा मोर्चा आंदोलन करेल असा इशारा भा.ज.पा.यु.मो शहराध्यक्ष ने दिला आणि सदैव विद्यार्थ्यांचा हितासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अमळनेर त्याच्या सोबत आहे.

निवेदन देताना युवा मोर्चा शहर अध्यक्ष योगीराज चव्हाण, शहर चिटणीस पंकज भोई भा.ज.पा.यु.मो सरचिटणीस कल्पेश पाटील,भूषण पाटील परेश सोनवणे,बाळा पवार योगेश जाधव,प्रणव महाजन*






