वनगळी पारेकर वस्ती जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपपुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकरपुणे– इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकरवस्ती मध्ये स्वर्गिय विलास फाउडैशन च्या वतीने सौ भाग्यश्रीताई हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप जि.प.शाळा येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी बाबासाहेब पाटिल. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पारेकर, अतुल पारेकर नितीन पारेकर सामाजिक कार्यकर्ते अजित पारेकर लालासाहेब सपकळ, ह. भ. प.सोमनाथ मदने महाराज, स्वप्नील हिरालाल पारेकर , भाऊ नाना पारेकर प्रमोद चौधरी अमोल कामटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्ता पारेकर मित्र परिवाराच्या वतीने शाळेतील गरजू ४७ विद्यार्थ्याना वह्या पेन पेन्शिल वितरण यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन . ज्ञानेश्वर सपकळ यांनी केले. दत्ता पारेकर यांनी स्पष्ट जि प शाळा ही तालुक्यात प्रथम करण्याचा मानस व्यक्त केला. ह .भ. प . मदने महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गेली ११ वर्षा पासुन या फाउडैशनच्या माध्यमातून हे शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ही हे फाऊंडेशन अग्रेसर असते. मुख्याध्यापक संतोष घोडके यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक सविता पवार यांनी सूत्रसंचलन केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका संगिता भिसे यांचे सहकार्य लाभले.






