एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ उत्साहात पार
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने पदवी ग्रहण समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित डॉ. सुनिल जी. भीरूड उपसंचालक,VJTI मुंबई आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रविण नेमाडे,परीक्षा प्रमुख डाॅ. सोमनाथ कोलगिरी,डाॅ.एम .आर.क्षीरसागर व सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहूणे डॉ. सुनिल जी. भीरूड विदयार्थांना मार्गदर्शन करताना म्हटले कि समाजाचा विकास साधण्यासाठी संशोधनावरती भर दिला पाहिजे. तसेच भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे कसे जायचे याबद्दल त्यानी मार्गदर्शन केले. चार वर्षांमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा भावी आयुष्यामध्ये कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल याबद्दल त्यांनी सांगितले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण नेमाडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होणाऱ्या पदवीप्रदान समारंभाची संकल्पना पटवून दिली प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील जीवनात यश प्राप्तीसाठी मार्ग मोकळा व्हावा असे कार्य घडावेत यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच नोकरीच्या दिशेने वाटचाल आणि स्वावलंबी होण्यासाठी विविध उपाय सुचवले.तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा मा. अंकिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व पदवीबरोबरच जबाबदारीची जाणीव बाळगणे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी स्वतःची कार्यक्षमता ओळखून योग्य त्या क्षेत्रात नोकरी करावी व समाजाला समस्यामुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. ना.हर्षवर्धन पाटील , उपाध्यक्ष अंकिता पाटील, सचिवा भाग्यश्री पाटील, सल्लागार डॉ गिरीश देसाई, प्राचार्य डॉ प्रविण नेमाडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.उमेश गावंडे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक याचे मोलाचे सहकार्य लाभले.






