चांपा येथे स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्यात शिवमूर्तीची स्थापना
अनिल पवार
चांपा , ता २४:मृत्यूनंतरही मृतात्माची अवहेलना होत असतांना गावकरी अनेक वर्षापासून गावात स्मशानभूमीची मागणी करीत होते .चांपा येथे वनविभागाच्या अडथळयाने ७३ वर्षापासून स्मशानभूमीचे काम रखडले होते .गावात स्मशानभूमी अभावी अनेक वर्षापासून गावकऱ्यांनी उघड्यावरच मृतदेह जाळले.
स्वातंत्र्यानंतरही गावात स्मशानभूमीच्या गावकऱ्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केळाची टोपली दिली .उच्चशिक्षित नवनिर्वाचित सरपंच अतिश पवार यांनी स्मशानभूमीची जटिल समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला व अखेर स्मशानभूमीच्या मागणीला यश आले.
स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदाच ७३ वर्षापासूनच्या स्मशानभूमीच्या मागणीच्या प्रतीक्षेत असलेल्या गावकऱ्यांना सरपंच अतिश पवार यांच्या प्रयत्नातून गावाला स्मशानभूमी मिळाली .
चांपा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्यात स्व .दादासाहेब कन्नमवार स्मृति प्रतिष्ठान चे अध्यक्ष रोहित दादा माडेवार यांनी भगवान शिवची मूर्ती चांपा गावाला भेट दिली .सरपंच अतिश पवार व उपसरपंच अर्चना सिरसाम ग्राम .सदस्य व ग्रामस्थांच्या श्रमदानातून एका दिवसात चबुतरा तयार केला .व थाटामाटात भगवान शिवच्या प्रतिमेला डीजे ढोल ताशाच्या तालावर संपूर्ण गावात भ्रमण करून महाशिवरात्रीच्या दिवशी स्मशानभूमीचे लोकार्पण व सोबतच शिवमूर्तीची स्थापना सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते करण्यात आली .सर्व ग्रामस्थांनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले .






