Amalner

वाचन संध्या कार्यक्रम उत्साहात साजरा, अमळनेरकर रसिक भारावले!!

वाचन संध्या कार्यक्रम उत्साहात साजरा, अमळनेरकर रसिक भारावले!!
जोशात पार पडली युवा कलाविष्कारांची अनोखी वाचन संध्या!!

अमळनेर: अमळनेर रीडर्स असोसिएशन आणि पु. साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘वाचन संध्या’ हा साहित्यिक कार्यक्रम रसिकांच्या भरगोस प्रतिसादात पार पडला. अभिवाचन व साहित्य चर्चा यांची गुंफण अमळनेरकर रसिकांना भावली.

वाचन संध्या कार्यक्रम उत्साहात साजरा, अमळनेरकर रसिक भारावले!!शुक्रवार सायंकाळी जुना टाऊन हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री दिलीप सोनवणे यांच्या काव्य सादरीकरणाने झाले. वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे अशी भूमिका त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडली. या नंतर निखिल बैसाणे यांची भयकथा, मेघागौरी घोडके यांची स्त्रीवादी कथा, सारांश सोनार यांनी केलेलं बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचं अभिवाचन, सचिन पाटील यांचं काव्यवाचन याला रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘पुस्तकांवर बोलू काही’ या परिसंवादात उदयकुमार खैरनार, सारांश सोनार, विवेक अहिरे, योगेश संदानशिव, भोजराज पाटील, कुणाल शिरूडकर यांनी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघागौरी घोडके आणि निखिल बैसाणे, सूत्रसंचालन हर्षदा महाजन व विवेक अहिरे, तर ऋणनिर्देश गुंजन क्षीरसागर यांनी केलं.

वाचन संध्या कार्यक्रम उत्साहात साजरा, अमळनेरकर रसिक भारावले!!

कार्यक्रमाला गं. का. सोनवणे, प्रा. सौ. भांडारकर, भाऊसाहेब देशमुख, रणजीत शिंदे, प्रा. लीलाधार पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा. रमेश माने, अशोक बिर्‍हाडे, गोकुळ बागूल, सतीश देशमुख, भारती गाला, नयन पाटील, आदि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात निखिल बैसाणे, मेघागौरी घोडके, उदयकुमार खैरनार, सारांश सोनार, तन्मय पाटील, गुंजन क्षीरसागर, सुवर्णा देसले, स्वप्निल चव्हाण, सोनिया भावसार, भोजराज पाटील, कृष्णा संदानशिव, सौ. प्राजक्ता शुक्ल, हर्षदा महाजन, पुजा सुरसुरे, कुणाल शिरूडकर, अमोल संदानशिव, कुणाल पवार, व पु साने गुरुजी ग्रंथालयाच्या सर्व संचालक व कर्मचार्‍यांनी योगदान दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button