अमळनेरचा पहेलवान घेणार कुस्तींचा धडा….
तयार होत आहे बोरी पात्रात कुस्तींचा आखाडा…._
रजनीकांत पाटील
कोंडाजी व्यायामशाळा ,शिवाजीनगर पैलाड,जयहिंद व्यायाम शाळा, शिरुडनाका,पवनपुत्र व्यायाम शाळा, भोईवाडा, जयगुरु व्यायाम शाळा,झामीचौक,बालवीर व्यायाम शाळा, बंगाली फाईल,सानेगुरुजी व्यायाम शाळा,सानेनगर,सिध्दार्थ व्यायाम शाळा,फरशी रोड,चाँद शहावली व्यायाम शाळा,कसाली मोहल्ला,कुरेशी व्यायाम शाळा,अंदरपुरा,प्रतापकुमार व्यायाम शाळा,गलवाडे रोड इ.अमळनेर शहरातील विविध व्यायाम शाळांच्या माध्यमातुन तरुणांना निरोगी व सुदृढ शरीर कमवण्याची संधी मिळते त्याप्रमाणे अमळनेर शहर व तालुक्यातील मल्लांना तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी तसेच विजयी होता यावे व अमळनेर तालुक्याचे नाव राज्यात व देशात कुस्ती खेळासाठी प्रसिध्द व्हावे ही दुरदृष्टी* डोळयासमोर ठेऊन मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी बोरी नदी पात्रात नगरपालिकेमार्फत ४० फुट व्यासाचा व १ मीटर उंचीचा आखाड्याचे भुमिपुजन केले…

सदर आखाड्याचे भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मा.नगरसेवक संजय कौतिक पाटील(भुतबापू ),नगरसेवक प्रतापआबा शिंपी*, शेखा मिस्तरी, निशांत अग्रवाल, संजय पहेलवान, रावसाहेब पहेलवान, शब्बीर पहेलवान, बाबु साळुंखे, समाधान धनगर, विजय पाटील, बाळु पाटील, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कुस्ती आखाड्याची मागणी तालुक्यातील कुस्तीगीरांच्यावतीने संजय कौतिक पाटील (भुत बापू ), प्रताप शिंपी, संजय पहेलवान (पैलाड) रावसाहेब पहेलवान (सानेनगर), शब्बीर पहेलवान यांनी केली होती.






