Amalner

? राजकीय विश्लेषण…. घड्याळाचे काटे कमळाला टोचले..”ठरलेलं” दोन जणांना पडलं महागात…ठरलेलं दान पडलं उलटं

? राजकीय विश्लेषण घड्याळाचे काटे कमळाला टोचले..”ठरलेलं” दोन जणांना पडलं महागात…ठरलेलं दान पडलं उलटं…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे पार पडलेल्या द्विपक्षीय नागरी सत्कार प्रसंगी आमदारांनी केला गौप्यस्फोट.आमचं ठरलं होतं म्हणत लोकशाही पेक्षा राजकीय गद्दारी ने निवडणूक जिंकता येते हे सिद्ध केले आहे. सामान्य लोक लोकशाही मार्गाने मतदान करतात आणि मग लोक प्रतिनिधी निवडून येतो असा साधारण पणे लोकांचा विश्वास आहे. पण एकाच समाजातील लोकांनी ठरवुन लोकप्रतिनिधी निवडुन आणण्याची घटना अख्या महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे.आणि खुद्द आमदारांनी ते खुले आम मान्य केले आहे.

भारतीय जनता पक्ष शिस्त आणि कटी बद्धता यासाठी पूर्वीच्या काळी ओळखला जात होता.परन्तु पक्षाशी सरळ सरळ गद्दारी अमळनेर शहरात विकासाच्या नावाखाली,जाती पातीच्या नावाखाली,सत्ते च्या लोभासाठी अनेक वेळा झालेली आहे. मग माजी आमदार जे घड्याळाशी एकनिष्ठ होते,स्वतः विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक होते ( भाषणातून मात्र एकनिष्ठ पणा च्या गोष्टी सांगत आहेत) एका रात्रीत स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आणि ठरवून निवडून येणारे नेते कितपत विश्वासार्हय आहेत हा मोठा प्रश्न कालच्या नागरी सत्कारा नंतर नागरिकांना पडला आहे .कालच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अनुपस्थिती अत्यन्त बोलकी होती.घड्याळाशी असलेलं नातं तोडुन कमळ हाती धरलेले माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,विधान परिषद आमदार स्मिताताई वाघ यांची अनुपस्थिती सर्वांनाचं खटकली. इतर धनुष्यबाण पोहचला नाही , इंजिनचे डिझेल संपले असावे,बहुजन मुक्ती मोर्चा आणि इतर पक्षीय नेते दिसून आले नाहीत.त्यामुळे हा सर्व पक्षीय नागरी सत्कार नसून राष्ट्रवादी काँग्रेस ने स्वतःच स्वतःचा सत्कार करून घेतला हे ही सामान्य नागरिकांना समजलं आहे.विधानसभा निवडणुकीत ठरल्या प्रमाणे घडलं खरं पण यात काय काय ठरलं होतं हे काही विद्यमान आमदार यांनी स्पष्ट केले नाही आणि जे काही ठरलं होतं ते पूर्ण न झाल्याने खूप मोठी हानी राजकीय वर्तुळात झाली आहे.राजकीय,आर्थिक,सामाजिक,जातीय गणिते मांडून जे ठरलं त्याचा फटका बहुजन नंदुरबार कर आणि कमळाच्या नंदनवनातील वाघांना बसला आहे.हे मात्र सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button