भरधाव वेगाने अॅपेरिक्षा पलटी; एक जण जागीच ठार
पारोळा (प्रतिनिधी) कमलेश चौधरी
पारोळा अमळनेर रस्त्यावरील रत्नापिंप्री _सडावण दरम्यान रत्नापिंप्री हून कन्हेंरे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अॅपेरिक्षा गाडी क्रमांक एम.एच.०२ सी. ई. १३३७ अपघात होऊन तीनदा पल्टी झालेल्याची घटना संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात बाविस वर्षीय तरूण सुनिल मधूकर कोळी (रा.कन्हेंरे ता. अमळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला भरधाव वेगाने जाणाऱ्या या गाडीला अनेक वाहनांचे चालकानी सांगितले कि या गाडीचा एवढा वेगहोता कि गाडी आवरणेच कठीण होते अचानक ब्रेक मारल्याने गाडी पल्टी होऊन तीनदा पल्टी झाली. यात सुनिल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवाजी भिल , जय पाटील , व एकाचे नाव माहित नाही हे जखमी झाले आहेत जखमींना पारोळा रूग्णालयात उपचार साठी पाठविण्यात आले तर तात्काळ पारोळा पोलिस स्टेशन ला संपर्क साधला.

अपघात स्थळी अॅब्यूलंन्स पाचारण करून मयत कोळीचे शव पारोळा कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले घटनेची माहिती गावात पसरताच गाव सुन्न झाले घरचा कर्ता मुलगा होता असे सांगण्यात आले त्याच्या पश्चात आई ,भाऊ असा परिवार आहे.






