विदर्भात बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चांप्याची ओळख बनवणार
ओबीसी रा. कॉ. प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाडबुदे यांचे प्रतिपादन
चांपा, ता २०: अनिल पवार
नागपूरच्या राष्ट्रीय बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (एनआरबीएम) गेल्या चार वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा नागपूर उमरेड तालुक्यातील चांपा येथे प्रशिक्षण शिबिर या माध्यमातून मोठा प्रशिक्षीत वर्ग जिल्ह्यात तयार होत असून रोजगारयुक्त जिल्ह्याकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यात बांबूपासून वस्तू बनविणारे गाव म्हणून चांपा गावाची ओळख निर्माण करणार , असे आश्वासन ओबीसी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाडबुदे यांनी दिले. अध्यक्षीय भाषणात जागतिक उद्योगाची गरज लक्षात घेउन राज्यातील ६ ठिकाणी जागतिक दर्जाची उच्च श्रेणी कौशल्य केंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाणार आहे , त्यामध्ये उमरेड तालुक्यातील महिला बचत गट , युवक, युवती व शेतकऱ्यांचे सशक्तीकरण व रोजगार निर्माण करण्यात येईल या कामासाठी लागणारी आवश्यक असणारी व्यापक मार्गदर्शन व तसेच लागणारी मदत वैधानिकाकडून प्राप्त करून देण्यात येईल .

चांपा येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयाजवळील वन धन जन धन वस्तू विक्री केंद्राच्या अत्याधुनिक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी एन आर बी एम संस्थेचे संचालक युपकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रा .कॉ .ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाडबुदे यांना संचालक युपकुमार यांनी कलाकुसरेचा बांबू पासून तयार केलेली तलवार भेट म्हणून दिली . यावेळी संस्थेचे सचिव संगीता पंचबुदे , प्रकल्प व्यवस्थापकिय संचालक स्वीटी पात्रे , संस्थेचे प्रबंधक व्यवस्थापक मनीष कवाळे,महाराष्ट्र व्हीजेएनटी संघटनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रोहित माडेवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत मशनरीची सीईओ वेदप्रकाश सोनी , गराडे ,उमरेड पंचायत समिती सदस्य प्रियांका लोखंडे , चांप्याचे सरपंच अतिश पवार , पाचगावच्या सरपंच उषाताई ठाकरे , उपसरपंच अर्चना सिरसाम ग्रामपंचायत . सदस्य सूरज माहूरे आदी उपस्थित होते.
कुठल्याही अद्ययावत विक्री केंद्राला शोभेल अशा या केंद्रामध्ये बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा, बांबूची कचरा पेटी , तलवार, समई,जहाज, आकाश दिवा तसेच अनेक शोभेच्या वस्तू या ठिकाणी विक्री व प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या आहेत. चांपा गावाचे वैशिष्ट्य व वेगळेपणा दाखविण्यासाठी हे केंद्र आकर्षण ठरणार आहे. बांबूपासून बनलेल्या अभिनव भेट वस्तूंनी सज्ज केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी बांबूपासून विविध वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक मशिन लावण्यात आल्या आहेत. उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार असून या भागात सामूहिक उपयोगिता केंद्र लवकरच निर्माण होणार आहे. या माध्यमातून युवक युवती व महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला .






