निमसाखर येथे शिवसेनेच्या वतीने जेष्ठ नागरिकांना मदत..
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
आज निमसाखर ता. इंदापूर या गावामध्ये शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात आली. दळवी वस्ती या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये गावातील जेष्ठ नागरिक यांना निमंत्रित करून मुंबईचे शिवसेना शाखाप्रमुख नाथा दळवी यांनी सालाबाद प्रमाणे आपल्या गावातील वरिष्ठ नागरिकांना थंडीपासून बचाव होण्यासाठी उष्ण कपडे वाटप करण्यात आले.
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळेस गावातील सरपंच धोंडीबा दळवी, सोमनाथ दळवी, मेजर शंकर दळवी, गोरख दळवी, विश्वनाथ दळवी, अधिक दळवी, सुरेश लवटे, गोविंद सागर, गाडेकर नाना दळवी व गाव गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळेस बालवाडीतील महिला शिक्षक व अंगणवाडीतील महिला शिक्षिका यांचाही सत्कार करण्यात आला.






