Amalner

? Breaking News… गट विकास अधिकारीनी गंगा उलटी वाहीनी…हागानं डब्ब उलटं पडणं….अपुरी पुंगी खस्ता खाये….हागणदारी मुक्त जाहीर केलेल्या ग्रामपंचायती खोट्या??

गट विकास अधिकारीची गंगा उलटी वाहीनी…हागानं डब्ब उलटं पडणं….अपुरी पुंगी खस्ता खाये….आधी कार्यवाही मग जन जागृती…हागणदारी मुक्त जाहीर केलेल्या ग्रामपंचायती खोट्या??

महाराष्ट्र मराठी 7 लवकरच करणार मोठा खुलासा

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर – तालुक्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्याच्या नावाखाली पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी अनेक गावातील गरीब ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केले.आधी सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रबोधन न करता सरळ सामान्य लोकांना अधिकारी पदाचा धाक दाखवून कायदेशीर कारवाई केली. यात असेही लोक आहेत की जे त्या गावात राहतच नाही त्यांच्या वरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा असे प्रबोधन करणे आवश्यक होते.विशेष म्हणजे काही ठराविक ठिकाणी च गटविकास अधिकारी यांनी कारवाई केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जे मॉडेल शौचालय बांधण्यासाठी देण्यात आले होते त्या मॉडेल प्रमाणे शौचालय बांधण्यात आलेले नाहीत याचा कायदेशीर आणि कागदोपत्री खुलासा लवकरच महाराष्ट्र मराठी 7 करणार आहे.

? Breaking News... गट विकास अधिकारीनी गंगा उलटी वाहीनी...हागानं डब्ब उलटं पडणं....अपुरी पुंगी खस्ता खाये....हागणदारी मुक्त जाहीर केलेल्या ग्रामपंचायती खोट्या??

? गटविकास अधिकारी यांनी खालील तालुक्यातील 6 ग्रामपंचायती १००% हागणदारी मुक्त जाहीर केल्या आहेत….अमळनेर तालुक्यातील एकतास, मेहेरगाव, सुंदरपट्टी ,दहिवद,नागाव खुर्द,भरवस या 6 ग्रामपंचायती १००% हागणदारी मुक्त झाल्या आहेत. असे गटविकास अधिकारी यांनी जाहीर केले आहे. आणि आता दहिवद येथे जनजागृती करण्यात येत आहे.याचा अर्थ एकतर दहिवद हे गाव 100% हागणदारी मुक्त झालेले नाही किंवा जी माहिती देण्यात आली ती खोटी आहे.आणि प्रशासनाचा निधी ,पैसा अयोग्य ठिकाणी उपयोगात आणला जात आहे. जे गाव 100% हागणदारी मुक्त आहे तेथे आता जनजागृती ची आवश्यकता का???

? Breaking News... गट विकास अधिकारीनी गंगा उलटी वाहीनी...हागानं डब्ब उलटं पडणं....अपुरी पुंगी खस्ता खाये....हागणदारी मुक्त जाहीर केलेल्या ग्रामपंचायती खोट्या??

एकच काहीतरी गटविकास अधिकारी यांनी ठरवावे त्यांना कळत नसेल तर त्यांनी कोणाची तरी मदत घ्यावी .हे तर असं आहे प्रशासनाची गंगा उलट दिशेने वाहत आहे.आजही अनेक गावांमध्ये या बाबत जन जागृती झाली नाही. याबाबतीत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व उलटी वाहणारी गंगा सरळ करावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button