Amalner

श्रीराम सिटी फायनान्स कडून कर्जदाराची फसवणूक वाद पोहचला पोलिसांकडे

श्रीराम सिटी फायनान्स कडून कर्जदाराची फसवणूक

वाद पोहचला पोलिसांकडे

अमळनेर : कर्जदाराने कर्ज जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त कर्ज पास करुन व नियमबाह्य त्यावर व्याज आकरुण श्रीराम सिटी फायनान्स ने आपली फसवणूक केली असल्याचा आरोप सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सुभाष शिंपी यांनी करत अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुभाष शिंपी यांनी श्रीराम सिटी फायनांस कडून 30 लाखांचे कर्ज घेतले ते प्रत्यक्षात 35 लाख पास केले व त्या 35 लाखांवर व्याज आकरण्यात येऊन हप्ता ठरवून देण्यात आला. जास्त व्याज आकरण्यात येणार असल्याचे लक्षात येताच सुभाष शिंपी यांनी कायदे अभ्यासक व वकील रणजीत बिऱ्हाडे यांचे मार्गदर्शन घेऊन अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे यात एकूण 14 आरोपी असून पोलिस निरीक्षक अम्बादास मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणी संपूर्ण भारतात असे अनेक जणांची फसवणूक झाल्याचे समोर येइल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button