Amalner

स्पर्धा परीक्षा व इतिहास कार्यशाळा संपन्न

स्पर्धा परीक्षा व इतिहास कार्यशाळा संपन्न

अमळनेर नूर खान

प्रताप (स्वायत्त) महाविद्यालय अमळनेर,इतिहास विभागामार्फत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेमध्ये आवश्यक असलेले ज्ञानमीमांसेचे सखोल मार्गदर्शन IQAC समन्वयक डॉ जयेश गुजराथी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ डी एन वाघ यांनी बक्षीस वितरण करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

स्पर्धा परीक्षा व इतिहास कार्यशाळा संपन्न

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्यातील कल ओळखून आपले क्षेत्र निवडावे असे डॉ डी एन वाघ यांनी प्रतिपादन केले परीक्षेच्या निकाला नन्तर लगेचच पारितोषिक वितरित करण्यात आले प्रथम -दीपक चव्हाण, द्वितीय -विशाल पाटील,तृतीय- प्रेरणा चौधरी, चतुर्थ -सर्वेश माळी व पाचवा क्र कुणाल पाटील यांना मिळाला डॉ डी आर चौधरींनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विजय साळुंखे यांनी आभारप्रदर्शन केले कार्यक्रमाला प्रा अवित पाटील भाग्यश्री जाधव व इतिहास विभागाच्या सिनियर विद्यार्थ्यांनी मेहेनत घेतली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button